best Marathi books for reading — सर्वोत्तम मराठी पुस्तके

Yogeshsawant
9 min readAug 29, 2022

Marathi best selling books

मराठी भाषेला अनेक महान साहित्यिक लाभले. ज्यांनी आपल्या साहित्यकृतींनी मराठीची पताका सातासमुद्रापार पोहोचवली. मराठीतील ऐतिहासिक historical novels in marathi कादंबरीचा मोठा वाचकवर्ग आहे. त्यांची वाचनतृष्णा भागविण्यासाठी अनेक लेखक पुढे आले आणि अभिजात साहित्यकृतींची निर्मिती झाली. मराठीतील अशाच महान साहित्यकृतींची माहिती( best marathi books an novels) आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही पुस्तकें प्रत्येक मराठी वाचकाने वाचली पाहिजेत- best marathi books to read आणि तसेच त्यांच्या संग्रहि देखील असली पाहिजेत. प्रत्येक पुस्तकांतर लिंक दिली आहे किंवा सुरुवातीला मुखपुष्ट दिले आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमची प्रत मागवू शकता

here is list of some of the best books in marathi. every maharshtriyan should read these best selling marathi books. with every book there are links to order the books, you can order your favourite marathi book by clicking on the cover of the book or link.

best marathi books list

१ दुनियादारी- सुहास शिरवळकर

पुस्तक चांगलं असणं,पुस्तक आवडणं /नावडणं,पुस्तक बेहद्द आवडणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”दुनियादारी”ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मनात घर करून राहिलेली कादंबरी आहे. पुस्तकात काय आहे हे सागायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते,तिच्याबरोबर जगायला लावते,अनुभवायला लावते.” लावते” हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली आपण गुंतत जातो,एवढे कि त्यातून बाहेर पडण कठीण होऊन जातं.कथानकाचा काळ जरी अगदी आजचा नसला तरी

ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !तुमची, माझी, आपल्या मित्रांची.घराघरांतून नित्य घडत असणारी.म्हणूनच,
जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी,आनंद-दुख,प्रेम — मत्सर … या भावना मानवी मनात
अनंत आहेत ; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्येमानसिक अंतर आहे, तोपर्यंतही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.

सु शि नि वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली मास्टर पीस कादंबरी.ती वाचताना आपण त्यातील पात्रांशी एवढे एकरूप होऊन जातो कि त्यातील काही पात्रांमध्ये आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रांना तर काहीमध्ये आपल्या नातेवाईकांना .पात्र एवढी जिवंत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.

श्रेयस तळवलकर हा साधा सालस निरागस कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला कथानायक (तस कथानायक नाही म्हणू शकत दिग्या ,MK ,राणीमा,मिनू सगळेच कथानायक).sp कॉलेज ,dsp उर्फ दिग्या ,mk ,शिरीन,मिनू,राणी मां ,नितीन अश्य्क्या ,साईनाथ ह्या सगळ्याबरोबर त्याचा आयुष्य पुढे सरकत व दुनियादारी माहित नसलेला श्रेयस त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते लेखकाने अक्षरशः जिवंत केलय.

एक एक पात्रांबद्दल लिहायला लागल्यास पानेच्या पाने पुरनार नाहीत पण पुस्तक वाचून जो अनुभव येईल तो नाही देता येणार.मित्रांसाठी जीव टाकणारा ,चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा बिनधास्त ,निरागस,बेताल ,निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो.

MK च पात्रं ,त्याचे श्रेयस शी संवाद ,एके काळी प्रेम केलेल्या व ती न मिळाल्यामुळे सगळा आयुष्य दारूच आपली सोबती असा जगणाऱ्या ,जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या mk च्या बेवडा असूनही आपण त्याच्या प्रेमात पडतो.

कट्ट्यावरचे अवली मित्र,समंजस मैत्रीण ,न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यातला काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा सगळेच बेस्ट.प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच.

हसायला तितकीच रडायला लावणारी हि कादंबरी कित्येक वर्षांनी क्वाचली तरी तितकीच भावते,आवडते,हसवते व रडवतेहि !!!!!!!

दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्‌.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळ निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर

त्या सर्व वाचकांना,ज्यांनी ‘दुनियादारी’विकत घेतली;वाचनालयातून वाचली;मित्राची ढापली;वाचनालयाची पळवली…पण ‘दुनियादारी’वर मनापासून प्रेमच केलं!त्यांनाही,ज्यांनी “दुनियादारी”च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि….खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम ‘कट्टा-गँग्ज’ना,ज्या”दुनियादारी” जगल्या..जगतात…जगतील

तुमची प्रत आजच खरेदी करा

best Marathi book about nature-

२ रानवाटा: मारुती चितमपल्ली

निसर्गाविषयी ललित लेखनाचे हे पुस्तक. पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेय .वन्यजीव व्यवस्थापन ,वने,वन्य प्राणी व पक्शिजागाताविषयी उल्लेखनीय संशोधन त्यांनी केलेले आहे.

ह्या पुस्तकामधील बरेच लेख जुन्या दिवाळी मासिकांमध्ये छापले गेलेले आहेत(१९८५,८४,७७ ई सालात ).पुस्तकामधील सगळेच लेखन अप्रतिम व वाचनीय.निसर्गवेड्या माणसाला /वाचकांना अजून काय हवे.जे जे आपण प्रत्यक्ष जंगलात जाऊन अनुभवू शकणार नाही किंवा सामान्य माणसाला अनुभवता येणार नाही असे त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत.तनमोराचे दिवस,धन्चीडी,रानातली घरं,पाडस,इटीया डोहातील हुदाळे,शाल्मली,पक्षी निरीक्षण ,पांगारा,वन्यजीव निरीक्षणाची किमया व अरण्य वाचन असे एकाहून एक सरस लेख ह्या पुस्तकात आहेत.कदाचित नावावरून काही जणांना काहीच कळणार नाही पण वाचताना हे सगळे अनुभव आपल्याला थेट जंगलात घेऊन जातात.जंगलाच्या जादुई दुनियेची ओळख करून देतात.तशी त्यांची सगळीच पुस्तके मस्ट रीड आहेत.

ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार,भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार,मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.

तुमची प्रत आजच खरेदी करा

best Marathi books to read before you die

३ श्रीमान योगी- रणजित देसाई

राष्ट्रवाद आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनावर शिवाजींचा मोठा प्रभाव होता ज्या काळात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी शतकानुशतके राज्य केले तेव्हा लोकांमध्ये औदासिनता आणि उदासीनता निर्माण झाली.

वर्षानुवर्षे शिवाजीच्या जीवनात अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत आणि या अलंकारांचे फिल्टरिंग करणे आणि फक्त वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित करणे कठीण आहे.

हे तथ्य केवळ तथ्यांनुसार तयार करण्यासाठी लेखकाने प्रयत्न केले आहेत. या कल्पित राजाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी एकटे तथ्य पुरेसे रंजक आहेत.

शिवाजी एक माणूस होता ज्याने काहीही न सुरू करता राजवंश बांधला. त्यांची प्रेरणा नेहमीच त्यांच्या संस्कृतीत आणि आपल्या मातृभूमीवर असलेल्या प्रेमाबद्दल अफाट अभिमान बाळगतात. तथापि, तो धर्मांध नव्हता आणि त्याने आपल्या सर्व विषयांचा धर्म आणि इतर विभागांकडे दुर्लक्ष करून समान वागणूक दिली. त्याची लढाई बहुधा मुस्लिम राज्यकर्त्यांशी होती, परंतु त्याने आपल्या राज्यातल्या मुस्लिम रहिवाशांबद्दल कधीही वैरभाव दाखविला नाही.

शिवाजी जसा होता तसाच लेखकाने सादर केला आहे, त्यावर कोणत्याही प्रकारची शोभेची वस्तू नाहीत. शिवाजी एक गतिशील नेते, योद्धा आणि खानदानी होते. तो धर्मांध न होता धार्मिक होता, तो विश्वास होता, पण अंधश्रद्ध नाही, तो धैर्यवान होता पण मूर्ख नव्हता. मुस्लिम राजवंशांनी वेढलेल्या प्रदेशात हिंदू राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे ते एक स्वप्नवत होते. तरीही तो अत्यंत व्यावहारिक होता.

शिवाजी एक धाडसी योद्धा आणि एक उत्तम युक्ती होता. त्याच वेळी, तो एक चांगला प्रशासक देखील होता आणि त्याने बनविलेले राज्य त्याच्या राजवटीत अधिक मजबूत बनले. त्याने बर्‍याच पराभवांनाही सामोरे जावे लागले, परंतु त्याने कधीही आपला दृष्टि सोडला नाही आणि शेवटी, स्वप्न सत्यात उतरविण्यात त्याला यश आले.

या परंपरेत योगदान देणार्‍या शिवाजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू लेखकाने या पुस्तकात आत्मसात केले आहेत आणि अशा रीतीने या कथेत घडणाऱ्या घटनांमध्ये वाचकाला सामील होण्याची भावना दिली आहे. तुमची प्रत आजच खरेदी करा. मुखपृष्ठावर क्लिक करा

तुमची प्रत आजच खरेदी करा

.

४ पार्टनर — व पु काळे

वपुचं मास्टरपीस म्हणून ओळखल जाणारं पुस्तक..श्री पार्टनर ह्या नावानेी ह्या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा देखील प्रदर्शित झालाय.मध्यमवर्गीय श्री ,त्याचा मित्र पार्टनर व श्रीची पत्नी किरण हि मध्यवती पत्र व त्यांची कथा.साधारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना व पु नि छान रंगवल्या आहेत .पार्टनर व श्री चे सवांद अप्रतिम .शेवट अंगावर येतो .पुस्तक एकूणच अप्रतिम.व पुं चे वपुर्झा ज्यांनी वाचले तर त्यासारखी वाक्ये प्रत्येक पानावर येतात.अशी अप्रतिम वाक्ये लिहिणारा व पुं शिवाय माझ्या तरी पाहण्यात नाही .काही वाक्ये इथे देत आहे

>माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते ,तीच वस्तू त्याला पहायची आहे ,तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं

>अंधारात भिंती दिसत नाहीत ,आखून बांधलेल्या खोल्या अमर्याद आकार धारण करतात ,त्यात हरवून जायला सोप जातं .

>कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा ईतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही .माणसाच स्वताच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं.

> आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक.

मानवी जीवनाचा हा अभिजात स्वर आहे. हे पुस्तक आपल्याला विविध मानवी संबंधांचे स्वरूप सांगते आणि प्रत्येक मनुष्याचे आयुष्य पुढे आणते. हे माणसाच्या जवळजवळ प्रत्येक संबंध दर्शवते.

साधे सोपे कथानक आणि तशीच साधी पण जबरदस्त लेखनशैली यामुळे हे पुस्तक वेगळी उंची गाठते.

मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

तुमची प्रत आजच खरेदी करा

५ शाळा -मिलिंद बोकील

२०१२ मध्ये शाळा चित्रपट (ह्या पुस्तकावर आधारित )आल्यामुळे ह्या वर्षी पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची जोरदार चर्चा झाली .२००३ साली प्रकाशित झालेला हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालंय.चित्रपट म्हणजे केवळ मुळ कथेला ५०% च न्याय दिलाय अस माझ वैयक्तिक मत आहे.

पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.नववी त शिकणाऱ्या एका मुलाची हि कथा ७०-८० च्या दशकात घडलेली डोंबिवली मध्ये .त्या वेळे तरी डोंबिवली गावच होत.या वयात आणि त्या काळात जे काहि एखाद्या किशोरवयीन विद्यार्थ्याच्या बाबतीत घडु शकेल त्याची जबरदस्त कहाणी म्हणजे शाळा .पुस्तक कुठेहि खोटे वाटत नाही.सगळी पात्रे आपल्यासमोरच उभी आहेत असे वाटते.सर्व लेखन एकदम ओघवत्या भाषेत .सुममधे, डाऊट खाणे, लाईन देणे ,इचीभन असे काहि खास शब्द लेखकाने वापरले आहेत.पुस्तकातली पात्र म्हणजे मुकुंद , सुर्‍या, चित्र्या, सुकडी, केवडा,नरु मामा ,बहिण अंबाबाई सगळी पात्र झकास.पुस्तक एक उत्तम वाचनीय अनुभव.

मुकुंद जोशी ची नववीतील हि कहाणी मग त्यात मित्र आहेत ,प्रेम आहे ,मस्ती आहे ,शिव्या आहेत,तत्कालीन परिस्तिथी चा वर्णन आहे , प्रेमासाठी केलेले उपद्व्याप आहेत ,नंतरची विलक्षण हुरहूर आहे.पुस्तक संपता संपता आपण पण मुकुंद जोशी आपलाच कुणी आहे असे समजू लागतो. शाळेत गेलेल्या प्रत्येकाने शाळा हे पुस्तक वाचलेच पाहिजे

तुमची प्रत आजच खरेदी करा

मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

६ यक्षांची देणगी -जयंत नारळीकर

जयंत नारळीकर हे नावाजलेले वैज्ञानिक व लेखकही. त्यांच्या मते विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार आवश्यक आहे अनेक माध्यमे उपलब्ध असली तरीही वैज्ञानिकांमध्ये ह्याबाबतीत उदासीनता दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेय कि “विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुपं देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते व निदान मी लिहितो त्या कथा तरी ह्याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत”.

पुस्तकात एकूण १२ कथा आहेत व त्या सगळ्या सुरस आहेतच व आपल्याला बरीच नवीन वैज्ञानिक माहिती देतात जी रोज ऐकुन पण आपण दुर्लक्षित करतो अशीही . अनेक कथांमधून आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हातात घेतल्यावर खाली ठेवावे असे वाटत नाही .

मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

best marathi autobiography

७ झोंबी — आनंद यादव

झोंबी म्हणजे लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग.बालपण व सुरुवातीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्याशी केलेली ,झोंबा झोंबी म्हणजे हे पुस्तक.त्यांचे एकूण आत्मचरित्र ४ भागांमध्ये आहे.पुढील पुस्तके नांगरणी,घरभिंती आणि काचवेल ही होत.

पुस्तकाला पु लं ची१६ पानांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना वाचली की ह्या पुस्तकाला अजून कुठल्याही समीक्षानाची,अभिप्रायची गरज नाही असे वाटते.अतिशय उत्तम भाषेत पुस्तकाचा लेखाजोखा त्या १६ पानाच्या अर्कात आहे.

प्रचंड पराकोटीची गरिबी,अशिक्षितपणा,शिक्षणाविषयी पालकांची उदासीनता,पोटापाण्यासाठी करावे लागणारे काबाड कष्ट,जेवायलाही मिळेल ना मिळेल ही परिस्तिथी हया सर्वातून लढत झगडत कुठलाही पाठिंबा नसताना,आजूबाजूला फक्त नकारात्मकता दिसत असताना लेखक केवळ शिक्षणाच्या उर्मीने व इच्छेने जगत जातो व काबाड कष्ट करून अतंर्गत बुद्धिमत्ता व कष्ट ह्या जोरावर शिक्षण कसे पुरे करतो हे वाचनीय झाले आहे.

ही कादंबरी मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली,वाचकांचा ग्रामीण जीवनाविषयीचा दृष्टिकोनच बदलून टाकणारी ठरली.सर्वच स्तरावरून तिचं कौतुक झालं.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कारवा इतर अनेक पुरस्कार ह्या पुस्तकाला मिळालेत.

पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही केवळ जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते हीच शिकवण ह्या कादंबरीतून मिळते.कादंबरीतील पराकोटीच्या गरिबीचे व इतर प्रसंगाचे वर्णन कित्येकदा अंगावर येते.उत्कृष्ट म्हणून नावाजलेली ही कादंबरी नक्की .

तुमची प्रत आजच खरेदी करा

८ स्वामी — रणजीत देसाई

रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली ‘भैरव’ या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२मध्ये ‘रुपमहाल’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. ‘स्वामी’ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.
मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.
कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो.
इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी

तुमची प्रत आजच खरेदी करा

९ शितू — गोपाल नीलकंठ दांडेकर

गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.

कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.

शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.

रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच….

मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

तुमची प्रत आजच खरेदी करा

पुढील लिस्ट साठी ह्यावर क्लिक करा -

.

--

--

Yogeshsawant

I love to write about relationship,nature,kids,families,lifestyle,teenagers,culture,social issues etc